सिंधुदुर्ग: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई सत्र सुरूच ठेवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठ्याला एका नागरिकाकडून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कायदेशीर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी तलाठ्याचे नाव जितेंद्र काळू खेताडे (वय २८, रा. पिंगुळी, कुडाळ) असे आहे. तक्रारदाराने त्यांच्या जमिनीच्या संदर्भातील फेरफार व सातबारा उताऱ्यावर योग्य ती नोंद करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह पिंगुळी येथील साजा कार्यालयात अर्ज केला होता. परंतु, हे शासकीय आणि कायदेशीर काम विनासायास पूर्ण करून देण्याच्या बदल्यात तलाठी जितेंद्र खेताडे याने तक्रारदाराकडे वारंवार ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची मुळीच लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), सिंधुदुर्ग पथकाकडे नोंदवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियमानुसार पंचांसमक्ष या तक्रारीची गोपनीय पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान आरोपी तलाठी जितेंद्र खेताडे याने कामाच्या मोबदल्यात प्रत्यक्षात ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सायंकाळी कुडाळ येथील कार्यालयात भेटण्याचे ठरले होते, परंतु प्रत्यक्ष कार्यालयात भेट होऊ शकल्याने तक्रारदाराने तलाठी खेताडे यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधला. त्यावेळी आरोपीने तक्रारदाराला कुडाळ ते वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ पैसे घेऊन बोलावले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने त्या परिसरामध्ये सापळा रचून अत्यंत पूर्वनियोजित रीतीने पिंगुळीचा तलाठी जितेंद्र खेताडे याला तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम हाताने स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या यशस्वी कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी तलाठ्याला ताб्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित २०१८) मधील कलमांनुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास सिंधुदुर्ग एसीबीचे पोलीस उपअधीक्षक व त्यांचे पथक करत असून, महसूल विभागात या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




