
Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरालगत उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. आता मात्र या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत आहे. पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. सत्ताधारी भाजप उद्योगांना हव्या त्या सुविधा देऊ शकले नाहीत. परिणामी, ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. माजी खासदार नाना नवले, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे, तुषार कामठे, कैलास कदम, नवनाथ जगताप यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की एके काळी देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांचे राज्य होते. मात्र, काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सत्ता आली. त्यामुळे गेली दहा वर्ष महाराष्ट्राचे चित्र काही चांगले नाही. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विकास पाहण्यासाठी बाहेरील लोक येत होते. आता तसे चित्र राहिले नाही. आम्ही उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. मात्र, आता या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधाबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. त्यामुळे ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्या. हजारो लोकांचा रोजगार गेला. हे न शोभणारे चित्र आहे. त्यात दुरूस्ती करणे गरजेचे आहे. ज्यांच्या हातात दहा वर्ष सत्ता होती, त्या लोकांनी सत्तेचा विनियोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला नाही. त्यामुळे आज ही अवस्था आली आहे. ही अवस्था बदलण्यासाठी परिवर्तन, सत्तेत बदल करणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले.
जगतापांच्या विश्वासू समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश
सांगवी परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि जगताप कुटुंबाचे विश्वासू अशी ओळख असलेले अंबरनाथ कांबळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




