पुणे: पवना धरणात पाण्याची झपाट्याने वाढ; २४ तासांत ४२६ मिमी पावसाची नोंद, जलसाठ्यात मोठी भर

पुणे: मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत तब्बल ४२६ मिमी पावसाची नोंद झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची जलपातळी झपाट्याने वाढत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

सततच्या पावसामुळे मावळ परिसरातील नद्या, ओढे आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात दाखल होत असल्याने आगामी काही दिवसांत जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांनी तसेच पर्यटकांनी नदीपात्र, धरणाचा सांडवा आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *