नवी मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. प्रलंबित बिलाचा धनादेश मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडे तब्बल १५ टक्के लाचेची मागणी करणाऱ्या एपीएमसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (१९ मे) रंगेहात अटक केली. १ लाख ४० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना ही धडक कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेले अधिकारी
या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाचे उपसचिव (प्रभारी) तथा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक शरद आवटे (वय ४०) आणि स्वच्छता विभागाचा प्रभारी कार्यभार सांभाळणारा जनरेटर ऑपरेटर समीर म्हात्रे (वय ५५) यांचा समावेश आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
तक्रारदार कंत्राटदाराला ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीसाठी एपीएमसी आवारातील नालेसफाई आणि वार्षिक देखभालीचे कंत्राट मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने ११ लाख ९२ हजार ७१६ रुपयांचे बिल मंजुरीसाठी सादर केले होते. जीएसटी (GST) वगळता या बिलाची निव्वळ रक्कम ९ लाख ७८ हजार २७ रुपये इतकी होती.
हे बिल मंजूर करून देण्याचा मोबदला म्हणून डॉ. दीपक आवटे आणि समीर म्हात्रे यांनी कंत्राटदाराकडे एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजेच १ लाख ४६ हजार रुपयांच्या लाचेची (कमिशन) मागणी केली. कंत्राटदाराने बिलासाठी तगादा लावल्यानंतर, अखेर १ लाख ४० हजार रुपयांवर तडजोड झाली.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने थेट नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कांदा-बटाटा मार्केटमधील एपीएमसीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उपसचिव कार्यालयात सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे कंत्राटदार लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचला. तिथे समीर म्हात्रे याने डॉ. आवटे यांच्या सांगण्यावरून १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


