
Nanded :नांदेडमध्ये अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकर यांच्या निर्घृण खुनामुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला हा खून जुन्या वादातून झाल्याचे सांगितले जात होते, मात्र आता प्रेमसंबंध आणि सूड या कारणांमुळे हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोमवारी सकाळी चार जणांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करत सोनू कल्याणकर यांची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच आरोपींना अटक केली. अटकेदरम्यान एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंकुश गंदमवार जखमी झाला.
प्रेमप्रकरणातून खून?
सोनूच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, हा खून प्रेमप्रकरणातून आणि सूडबुद्धीने करण्यात आला आहे. सोनूचे एका मुलीसोबत संबंध होते. मात्र 2020 साली त्याने त्या मुलीची सोयरीक मोडल्याचा आरोप आहे. याच कारणावरून मुलीच्या भावाने बदला घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
तुरुंगातून रचला कट?
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून कुख्यात गुन्हेगार गोलू मंगनाळे याचे नाव समोर आले आहे. तो सध्या तुरुंगात असूनही त्यानेच हा कट रचल्याचा आरोप आहे. त्याच्या वडिलांसह इतर साथीदारांच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पूर्वीही झाला होता हल्ला
ऑगस्ट 2021 मध्येही गोलू मंगनाळे आणि त्याच्या साथीदारांनी सोनूवर गोळीबार केला होता. मात्र त्या हल्ल्यातून तो बचावला होता. त्यानंतरही त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.
सहा जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहर
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
महाराष्ट्र
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
- बीड: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! वडिलांच्या रागवण्यामुळे घर सोडलेल्या १० वर्षीय मुलीचा १४ तासांत शोध, १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत केली सुखरूप सुटका
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




