
Nagpur : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरमधील व्यापाऱ्यांची ५८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात बुकी अनंत जैनकडे आणखी घबाड सापडलं आहे. अनंत जैनच्या गोंदियामधील बँकेच्या ४ बँक लॉकरमधून तब्बल ४ कोटींचं सोनं आणि अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही जप्तीची कारवाई केली आहे.
अनंत जैनने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची फसवणूक केली होती. या व्यापाऱ्याने नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी अनंत जैनविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन गेमिंग ॲप तयार करून हजारोंना फसवणारा बुकी अनंत जैन याच्या बँक लोकरमध्ये घबाड सापडलं आहे. ४ कोटींचं सोनं आणि अडीच कोटींची रोकड जप् करण्यात आली आहे. आरोपीचे नातेवाईकंही फरार आहेत.'
आरोपीच्या गोंदियातील ॲक्सिस बँकेच्या चार वेगवेगळ्या लॉकरमधून घबाड जप्त करण्यात आले आहे. अनंत जैन यांच्या आणखी काही संपत्ती पोलिसांच्या रडारवर आहेत. अनंत जैन विदेशात पळून गेला असून त्याचे नातेवाईक तपासात सहकार्य कर नाहीत. पोलीस या प्रकरणाचा सर्वबाजूने तपास करत असून लवकरच यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल.', असं देखील अमितेशकुमार यांनी सांगितले.
अनंत जैनने इतर काही लोकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवल्याची माहिती पोलीस तपासामधून पुढे येत आहे. गोंदियातील अनंत जैनच्या घराची पोलिसांनी झडती घेतली त्यावेळी १७ कोटींची रोख रक्कम, साडेबारा किलो सोनं आणि ३०० किलो चांदी असा एकूण सुमारे २७ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. यावेळी पोलिसांना त्याचे गोंदियातील विविध बँकांमध्ये चार लॉकर असल्याचे आढळून आले. लॉकरची झडती घेण्याची परवानगी मिळावी यासाठी गुन्हेशाखा पोलिसांनी न्यायालयात अर्ज केले.
|
|
न्यायालयाने लॉकरची झडती घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मंगळवारी गुन्हेशाखा पोलिसांनी आनंतच्या चारही लॉकरची झडती घेतली. यात ८५ लाखांच्या रोख रकमेसह चार कोटी ५४ लाखांचे दागिने आढळले. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला. अनंत जैन सध्या दुबईत आहे. दरम्यान याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपीने अॅड. देवेन चौहान यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला आहे.
पण आरोपीने अनेकांची कोट्यवधीने फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात यावा,अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. दोन्ही पक्षाकडील युक्तीवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करण्याचा आदेश दिला.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



