बांधकाम परवानगीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Construction Map Permission: राज्यात शेतजमिनीच्या निवासी, व्यावसायिक अथवा औद्योगिक वापरासाठी लागणारी बिनशेती अथवा अकृषिक परवानगीची अट राज्य सरकारने कायमची हद्दपार केली. गेल्या आठवड्यात NA Permission ची अट रद्द करण्यात आली. जनतेसह बांधकाम व्यावसायिक, गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला. बांधकाम नकाशा हाच NA परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता नगररचना विभाग अथवा स्थानिक प्राधिकरणाची बांधकाम नकाशाला जी परवानगी असेल तीच एनए परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बांधकाम परवानगीची गरज नाही. याशिवाय वार्षिक बिनशेती करही रद्द करण्यात आला आहे. बांधकाम नकाशा कुठे आणि कसा मिळणार?
अकृषक परवानगीसाठी स्थानिक प्राधिकरण
नवीन नियमानुसार एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषक परवानगी मानली जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज नाही. महाराष्ट्रात घर अथवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगररचना विभाग अथवा स्थानिक प्राधिकरणाकडून महानगरपालिका, नगरपालिका अधिकृत बांधकाम नकाशा परवानगी घेणे बंधनकारक असते.
कसा कराल अर्ज
बांधकाम परवानगीसाठी BPMS अथवा Auto DCR द्वारे ऑनलाईन अर्ज नव्या नियमांबरोबरच करता येईल. महसूल विभागाच्या संगणकीय प्रणाली्वारे 7/12 उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाईल. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवटादार वर्ग 2 दर्जामध्ये बदल होणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेले नजराणा शुल्क नागरिकांना, बांधकाम व्यावसायिकांना भरावे लागेल. तसेच अर्ज सादर केल्यावर छाननीसाठी ऑनलाईन शुल्क भरावी लागते.
वस्तूविशारद TP Client सॉफ्टवेअरचा वापर करून नियमानुसार बांधकामाचा नकाशा तयार करतात. नकाशासाठी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केला जोता. नगररचना विभागाचे अधिकारी नकाशाची पडताळणी करतात. सर्व निमय पाळले असल्यास डिजिटल स्वाक्षरीने परवानगी प्रमाणपत्र दिले जाते.
कोणती कागदपत्रं लागणार
सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्ड
भूमी अभिलेख विभागाचा मोजणी नकाशा
नोंदणीकृत वास्तूविशारद परवाना प्रत
चालू वर्षाची घरपट्टी, अथवा मालमत्ता कर भरल्याची पावती
सरकारी यंत्रणा जसे अग्निशमन, पर्यावरण विभाग, विमानतळ प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




