
Pune : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए) अभ्यासक्रमासाठीचा प्रारुप आराखडा विकसित केला आहे. तीन आणि चार वर्षांसाठीच्या या अभ्यासक्रमात उद्योग क्षेत्राच्या गरजा, उदयोन्मुख कल विचारात घेण्यात आले असून, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अनुभव मिळण्यासाठी कार्यप्रशिक्षणही समाविष्ट करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांनी हा अभ्यासक्रम स्वीकारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले आहेत.
एआयसीटीईने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. बीबीए, बीएमएस, बीसीए हे अभ्यासक्रम यंदापासून एआयसीटीईने आपल्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांना आता एआयसीटीईची नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय नवा अभ्यासक्रम विकसित करण्याचे एआयसीटीईकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मिळून बीबीएसाठीचा नवा अभ्यासक्रम विकसित केला आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा, मागण्यांसह मुलभूत तत्त्वे, उदयोन्मुख कल लक्षात घेऊन तीन आणि चार वर्षे बीबीए अभ्यासक्रमासाठी १२० ते १६० श्रेयांकांचा प्रारुप अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
प्रारुप अभ्यासक्रमामध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण, अनुभवाधिष्ठित कार्यपद्धती, उद्योगसंबंधित प्रकल्पांवर भर देण्यासह समस्या सोडवण्याची क्षमता, चिकित्सक विचार, परिणामकारक संवाद कौशल्ये या अभ्यासक्रमातील मुलभूत घटक आहेत. उद्योग आणि शिक्षण यातील दरी दूर करण्यासाठी कार्यप्रशिक्षणाचाही (इंटर्नशीप) समावेश करण्यात आला आहे. प्रारुप अभ्यासक्रम समजून घेऊन उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करण्याची मुभा आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्याबरोबरच नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे.
राज्य समाइक प्रवेश कक्षाकडून (सीईटी सेल) बीबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत प्रवेशाद्वारे राबवण्यात आली आहे. गेल्यावर्षीपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येत होती.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




