
Mumbai : मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला. तरुणीचे केस कापून मातेफिरू फरार झाल्याची घटना घडली. १९ वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना एका माथेफिरूने तिचे केस कापले आणि हे केस तो बॅगेमध्ये भरून घेऊन गेला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी रुपारेल कॉलेजमध्ये शिकते. ही तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. दादर रेल्वे स्थानकावर पोहचताच एक तरुण पाठिमागून आला. त्याने गर्दीचा फायदा घेत सोबत आणलेली कात्री काढून तरुणीच्या केसावर फिरवली आणि तिचे केस कापले. यानंतर त्याने तिचे केस बॅगेत भरून सोबत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
|
|
दादर रेल्वे स्थानकावर तरुणीचे केस कापल्याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेतला. याप्रकरणी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने त्या तरुणीचे केस का कापले? या मागचे खरे कारण काय? याचा लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत.
या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. या संशयिताला दुपारनंतर कोर्टात हजर केले जाणार आहे. अधिक तपासासाठी त्याची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- महाराष्ट्र: 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजित दीपकेंना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची थेट खुली ऑफर; रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण
- छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
गुन्हा
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले



























Subscribe to my channel


