
Mumbai: आत्तापर्यंत वेगवेगळ्या चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. चोरी करण्यासाठी चोरांनी लढवलेल्या क्लुप्यांच्या कथाही ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये एका विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. मुंबईच्या कुरारमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या घरातील तब्बल साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पायल ज्योतीराम शेडगे (३१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून सध्या तिच्या प्रियकराचा शोध घेत आहे. याबाबत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनुसार, ते मालाड पूर्वेकडील ओमकार एस आर ए सोसायटीमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होते. मे २०२२ मध्ये ते आपल्या पत्नीसोबत सांगली या गावी गेले होते. गावावरून मुंबईत परतल्यानंतर आतला दरवाजाचा टाळा तुटल्याचे आढळून आले. तसेच घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटातील 3.77 लाखाचे दागिने आणि 4.57 लाखाची रोकड गायब झाल्याचेही लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी या संदर्भात कुरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून झोन 12 च्या डीसीपी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी टीम तैनात केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या तपासात ही चोरी घरातील व्यक्तीनेच केली असावी असा दाट संशय पोलिसांना होता. त्यामुळेच त्यांनी घरातील सदस्यांचा तपास करण्यास सुरुवात केली.
हा तपास करताना घरातील सर्व व्यक्तींच्या हाताच्या बोटांचे ठसे पोलिसांनी अगोदरच घेतले होते. यानुसार तक्रारदाराच्या पत्नीच्या हाताचे ठसे आणि कपाट आणि त्या ठिकाणी इतर वस्तूंवरील ठसे मिळते जुळते आढळून आल्याने पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली.
या चौकशीमध्ये संबंधित महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तसेच यामध्ये तिच्या प्रियकरानेही मदत केल्याचे सांगितले. हे दागिने आणि रोकड घेऊन ते दोघेही पळून जाणार होते. तसेच ही चोरी गावी जाण्यापुर्वीच केल्याचेही या महिलेने कबुल केले.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




