
Mumbai Crime : दादरमधील सुटकेस प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अर्शद अली शेखच्या (३० वर्षे) हत्ये प्रकरणी त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. पायधुणी पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली. अर्शदच्या हत्याप्रकरणात त्याची पत्नी रुक्सानाचा देखील सहभाग असल्याचे तपासादरम्यान कळताच पोलिसांनी चौकशी करत तिला अटक केली. अनैतिक संबंधातून अर्शद अली शेखची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. अर्शदच्या हत्येसाठी कट रचण्यात आला होता. याप्रकरणात आतापर्यंत ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकात लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत अर्शद अली शेखचा मृतदेह सापडला होता. या हत्या प्रकरणात पायधुणी पोलिसांनी अर्शदच्या पत्नीला अटक केली. अर्शदची पत्नी रूक्सानाचा देखील या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले. रूक्सानाचे अर्शदचा मित्र आणि या प्रकरणातील आरोपी जय चावडासोबत विवाहबाह्यसंबंध होते. यातूनच अर्शदची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अर्शदची पत्नी रूक्साना ही देखील मूक बधिर आहे.
|
|
पायधुनी येथे राहणाऱ्या जय चावडाने शिवजीत सिंग आणि अर्शद अली शेखला दारू पिण्यासाठी बोलावले होते. त्याचवेळी तिघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. यावेळी जयने शिवजीत सिंग याच्या मदतीने अर्शदची हत्या केली. अर्शदला नग्न करत हात-पाय बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर हातोड्याने क्रूरपणे त्याला ठार मारण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याच्या प्रयत्नात होता. पण दादर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी त्याला अटक केली.
अर्शदच्या हत्येनंतर शिवजीत सिंग फरार झाला होता. त्याला पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केली. अर्शदची हत्या करताना आरोपींनी मित्रांना व्हिडीओ कॉल केले होते. हत्या करताना बेल्जियमचा नंबर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला आरोपींनी व्हिडिओ कॉल केला होता. ही व्यक्ती कोण आणि त्यांचा या सगळ्यांशी काय संबंध होता याचा तपास पोलिस करत आहेत. या हत्याप्रकरणात पोलिसांनी जय चावडा, शिवजीत सिंग आणि रूक्साना अर्शद अली शेखला अटक केली आहे. आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
शहर
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
महाराष्ट्र
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- जळगाव: जिल्ह्यात सकाळीच भूकंपाचे जोरदार धक्के! रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, चोपडा, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर हादरले
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




