
Mumbai : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेला (उद्धव ठाकरे) फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) या मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार दिल्यामुळे पक्षातील मराठी कार्यकर्ते आणि समर्थर नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. या निर्णयामुळे मराठी मते दुरावणार असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनीही अपक्ष अर्ज भरल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा भाजपला मिळणार की मनसेला याबाबत उत्कंठा वाढली आहे.
पश्चिम उपनगरातील वर्सोवा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांना याच मतदारसंघातून सुमारे २१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वाट्याला आला असून या मतदारसंघात पक्षाने उपविभागप्रमुख हारून खान यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी नगरसेविका राजुल पटेल, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक देवेंद्र (बाळा) आंबेरकर, माजी नगरसेवक यशोधर फणसे यांची नावे चर्चेत होती. मात्र ठाकरे यांनी खान यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांसह शिवसैनिकही नाराज असल्याची चर्चा आहे.
|
|
वर्सोवा मतदारसंघात भाजपने भारती लव्हेकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांचे नाव जाहीर करण्यास भाजपने दिरंगाई केली होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वात आधी आपला उमेदवार जाहीर केला होता. गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेले संदेश देसाई यांनाच पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
भाजपचा मार्ग सुकर गेल्या वेळी या मतदारसंघातून शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांनी निवडणूक लढविली होती. तर राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळीही ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेची (उद्धव ठाकरे) मराठी मते ते मिळवणार का याबाबतही उत्सुकता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अल्पसंख्याक उमेदवार दिल्यामुळे या मतदारसंघात धार्मिक धृवीकरण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपचा मार्ग सुकर झाल्याचीही चर्चा आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

