बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक गावात किरकोळ कौटुंबिक वादातून एका निर्दयी पतीने आपल्याच पत्नीची कुऱ्हाडीने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मायावती शहादेव भारसाकळे (वय ४६ वर्षे) असे असून, आरोपी पतीचे नाव शहादेव शंकर भारसाकळे आहे. गुरुवारी घरात किरकोळ घरगुती कारणावरून या पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर बघता बघता मोठ्या भांडणात झाले. संतापाच्या भरात आरोपी शहादेव याने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि थेट मायावती यांच्या डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मायावती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
घटनेनंतर जखमी मायावती यांना तात्काळ उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती शहादेव भारसाकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. किरकोळ वादाचे पर्यवसान अशा भयानक हत्येत झाल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




