पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाच्या क्रूरतेची नवनवीन माहिती समोर येत आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे याला अत्यंत गुप्तपणे घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएट' (दृश्य पुनर्रचना) केला. यावेळी आरोपीने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणातील तपासाला नवी दिशा मिळाली असून, पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत.
अशी घडली थरकाप उडवणारी घटना
मूळची पुण्यातील असलेली ही चिमुकली उन्हाळी सुट्ट्यांसाठी आपल्या आजी-आजोबांकडे नसरापूर येथे आली होती. १ मे रोजी आरोपीने तिला गाठी शेव खाण्याचे आमिष दाखवून एका गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिने आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर तिची खात्री करण्यासाठी त्याने तिच्या छातीवर जोरात बुक्की मारली आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाखाली लपवून तो पसार झाला होता.
गोठ्यातच होता आरोपीचा मुक्काम
तपासात असे समोर आले आहे की, आरोपी भीमराव कांबळे हा गेल्या काही दिवसांपासून त्याच गोठ्यात राहत होता जिथे त्याने हे कृत्य केले. तिथे विटा उचलण्याचे काम तो करत होता. त्याचे कपडे आणि इतर साहित्यही पोलिसांनी तिथून जप्त केले आहे. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या तपासादरम्यान, चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, तिला तिथून कसे उचलले आणि गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार कसा केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
आज न्यायालयात होणार हजर
आरोपीची पोलीस कोठडी आज, ७ मे रोजी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीन रिक्रिएशनदरम्यान हाती आलेली नवीन माहिती आणि शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलासे पोलीस न्यायालयात सादर करणार आहेत. आरोपीचा क्रूर हेतू आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असून, आरोपीला भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel



