
Pune : मराठा आरक्षणासाठी रविवारी (११ ऑगस्ट) मराठा आरक्षण शांतता फेरीचेआयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
सारसबाग परिसरातून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास फेरीचा प्रारंभ होणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल,एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक,जंगली महाराज रस्ता मार्गे फेरी काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना भागातील छत्रपती संभाजी पुतळा येथे फेरी विसर्जित होणार आहे. शहराच्या मध्यभागातून फेरी जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करून दिले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
|
|
स्वारगेट परिसरातील जेधे चौक, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
– नवले पुल – वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतुक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.
– कोंढवा खडीमशीन चौक – जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.
– कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.
– फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.
जेधे चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे, मित्रमंडळ चौक, सावरकर चौकमार्गे जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांनी दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थली जावे. नीलायम चित्रपटगृह ते सावरकर पुतळा चौक वाहतूक बंद राहणार आहे. ना. सी. फडके चौक, सणस पुतळ्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय ते पूरम चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, राष्ट्रभूषण चौकमार्गे जाणारी वाहने शंकरशेठ रस्त्याने इच्छितस्थळी जातील. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक ) ते जेधे चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी मार्केट यार्ड किंवा नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी जावे. मार्केट यार्ड ते जेधे चौक दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या भागातील वाहनांनी शिवनेरी रस्त्याने वखार महामंडळ चौकातून इच्छितस्थळी जावे. पंचमी हॉटेल ते जेधे चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. पंचमी हॉटेल, शिवदर्शन चौक, गजानन महाराज मंदिरमार्गे वाहनचालकांनी पर्वती गावातून इच्छितस्थळी जावे. शिवदर्शन चौकातून मित्रमंडळ चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
शनिपार चौक ते कुमठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, रमणबाग प्रशाला ते अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चैाक, जयंतराव टिळक पूल ते शनिवारवाडा, कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा, मंगला चित्रपटगृह ते प्रिमियर गॅरेज
शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर न्यायालय, रेव्हेन्यू कॉलनी ते मॉडर्न चौक, झाशीची राणी पुतळा चौक ते सावरकर भवन, महात्मा फुले संग्रहालय ते झाशीची राणी पुतळा चौक
गोखले स्मारक चौक ते नटराज चित्रपटगृह रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. काकासाहेब गाडगीळ पूल ते केळकर रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रसशाळा चौकातून एस. एम. जोशी पूलमार्गे वाहतूक नळस्टाॅपकडे वळविण्यात येणार आहे. फेरी खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर टिळक चौक ते खंडोजीबाबा चौक वाहतूक बंद राहणार आहे. या भागातील वाहतूक कुमठेकर रस्ता, टिळक रस्तामार्गे सोडण्यात येणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




