Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा हाहाकार! आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Rain : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालं. नवरात्रीमध्ये देखील पावसाने झोडपून काढलं. आता दिवाळी तोंडावर आली तरी देखील पाऊस जायचे नाव घेत नाही त्यामुळे बळीराजा सध्या संकटात आहे. आजही राज्याला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. हवमान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

आज राज्यात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा पाऊस पडेल.

 



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *