
Mumbai : मुंबईकरांना दिलासा देणारे वृत्त समोर आलेय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मढ आणि वर्स्वोबा यादरम्यानच्या खाडी पूलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण आणि वन विभागाकडून अंतिम मंजूरी मिळाली असून दोन महिन्यात कामाला सुरूवात होईल. मालाडचा मढ आणि अंधेरीचा वर्सोवा यादरम्यान प्रवासासाठी दोन तासांचा वेळ लागतो. वाहतूक कोंडी असेल तर यामध्ये आणखी भर पडते. पण २२ किमीच्या या मार्गावर आता खाडी पूल तयार होणार आहे. त्यानंतर हे अंतर फक्त १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. वर्सोवा आणि मढ या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता या मार्गावर ३९०० कोटींचा प्रोजेक्टस सरकारकडून हातात घेण्यात आला आहे.
मढ आणि वर्सोवा हा २२ किमीचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागतात. पण वाहतूककोंडी असेल तर या प्रवासाचा वेळ आणखी वाढतो. पण खाडीवर ब्रिज तयार झाल्यास हा प्रवास फक्त १० मिनिटात पूर्ण होणार आहे. केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येणार आहे. यामध्ये डेक केबलद्वारे सहारा देण्यात येईल. हा ब्रिज २ किमी लांबीचा असेल. वर्सोवा खाडीवर हा ब्रिज तयार करण्यात येणार आहे. बीएमसीकडून हा ब्रिज बांधण्यात येत आहे.
|
|
वर्सोवा आणि मढ या ठिकाणी सर्वात वेग प्रवास सध्या जेटी, बोटद्वारे केला जातो. या प्रवासासाठी फक्त ५ मिनिटांचा वेळ लागतो. तर १० ते १५ रूपये खर्च करावे लागतात. पण जर बाईक असेल तर खर्च आणखी वाढतो. ही बोट चारचाकी वाहनांसाठी नाही. त्याशिवाय पावसाळ्यात बोटसेवा बंद असते. वर्सोवा आणि मढ या मार्गावार रस्तेमार्गे ९० ते १२० मिनिटांचा कालावधी लागतो.
BMC कडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून फेब्रुवारी २०२३ मध्ये याला परवानगी मिळाली. कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) ची मंजुरी आणि कंत्राटदाराची नियुक्ती देखील मिळाली आहे. या ब्रिजसाठी काही खारफुटीची झाडे तोडणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मंजुरी प्रलंबित होती. आता सरकारला या कामासाठी मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. २०२६ मध्ये या कामाला सुरूवात राहण्याची शक्यता आहे. हा पूल तीन वर्षांत पूर्ण करण्याचे प्लान सरकारचा आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




