
Kanpur : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आपला जीव दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत. अरुण कुमार राय असं जीव देणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्याची एका महिला कॉन्स्टेबलसोबत जवळीक वाढली होती. सहकारी पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला कॉन्स्टेबलने स्टेशन इन्चार्जचे काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत होते.
आता याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. तसेच, तिच्या मोबाइलचाही तपास सुरु आहे. ज्यामध्ये पोलिसांना काही मेसेज सापडले आहेत.
|
|
अरुण कुमार राय यांच्या मृत्यू प्रकरणात महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्माला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या लेखी तक्रारीवरून तिची चौकशी केली जात आहे. सूत्रांनुसार, मीनाक्षी आणि अरुण यांच्यात जवळचे संबंध होते. महिला कॉन्स्टेबलशी ही वाढती जवळीक त्यांच्या मृत्यूचे कारण असू शकते, असा संशय आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 14 मार्च 2024 रोजी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांची कोंच पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. 5 जुलै 2024 ला अरुण कुमार राय यांनी कोंच पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर इनचार्ज म्हणून पदभार स्विकारला. दोघेही सुमारे सात महिने एकाच पोलिस ठाण्यात एकत्र तैनात होते. या काळात, त्यांच्यातील जवळीक वाढल्याच्या अफवा तीव्र झाल्या. 22 फेब्रुवारी 2025 ला अरुण यांची ओराई पोलिस ठाण्यात बदली करण्यातआली, तर मीनाक्षीला 28 एप्रिल 2025 रोजी यूपी 112 युनिट- 1577 येथे पाठवण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण हे ओराईला गेल्यानंतर मीनाक्षीचे वर्तन बदलले. ती अरुण यांच्यावर विविध मुद्द्यांवरून सतत दबाव आणत होती. ती त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन वाद घालत असे, ज्यामुळे अरुण तणावात होते. सततचा ताण, संघर्ष आणि दबाव यामुळे अरुण कुमार राय यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असंही सांगण्यात येत आहे.
या खळबळजनक घटनेत, मृत इन्स्पेक्टरची पत्नी माया राय यांनी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की मीनाक्षीच्या कॉल डिटेल्स आणि चॅट्समुळे अनेक गुपिते उलगडू शकतात.
महिला कॉन्स्टेबल आणि स्टेशन इन्चार्ज यांच्यातील मोबाईल फोनवरील संभाषणाची नोंद देखील सापडली आहे. इतकंच नाही तर घटनेच्या काही काळापूर्वी, महिला कॉन्स्टेबलने तिची वर्दी मागण्यासाठी अरुण यांना फोन केला होता, माझी वर्दी द्या, मला घरी जायचे आहे, असं ती म्हणाली होती, अशीही माहिती आहे. घटनास्थळावरून एक पत्रही सापडले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


