पुणे: जेजुरी गडावर `येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात पार पडला खंडेरायाचा गणपूजा उत्सव

पुणे: महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी कडेपठार गडावर पारंपरिक पद्धतीने गणपूजा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी गडावर उपस्थित राहून खंडेरायाचे दर्शन घेतले आणि पूजा-अर्चा केली.

धार्मिक परंपरेनुसार आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देवगणांनी मार्तंड भैरवाची भंडाऱ्याने पूजा केली होती. त्याच स्मरणार्थ आजही गणपूजा उत्सव साजरा केला जातो. यावेळी स्वयंभू लिंगावर भंडारा अर्पण करण्यात आला, मंदिरात विशेष पूजाविधी, आरती आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले. गड परिसर 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेत नवस फेडले. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जेजुरीत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *