
Mumbai : डॉक्टर महिला आणि स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिकेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणं जेजे रुग्णालयाला महागात पडलंय. राज्य महिला आयोगानं दखल घेत रुग्णालयाला नोटीस बजावलीय. सर जे जे समूह रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका आणि डॉक्टर महिलेने विभागप्रमुखाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर काही कारवाई न झाल्यानं महिला आयोगानं संताप व्यक्त केलाय.
महिला डॉक्टरनं विभागप्रमुखाकडून त्यांना होत असलेल्या सततच्या मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे १० जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने रुग्णालय प्रशासनाकडून दोनवेळा, दिनांक १८ जुलै २०२५ आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल मागविला होता.
|
|
रुग्णालय प्रशासनाने अहवाल सादर न केल्याने याची गंभीर नोंद घेत आयोगाने याप्रकरणी दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोग कार्यालयात सुनावणी घेतली. सुनावणीस रुग्णालय प्रशासनाच्या वतीने उपस्थित व्यक्तीस तक्रार आणि त्यावर रुग्णालयाने केलेली कार्यवाही याबाबत कुठलीही माहिती नव्हती. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने न घेणे आणि आयोगाने मागितलेली माहिती वेळेत न देता, सहकार्य न करणे या गंभीर मुद्द्यांची नोंद घेत आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.
रुग्णालय आस्थापनेकरिता स्थापित अंतर्गत समिती (IC) कमिटीची संपूर्ण माहिती, तक्रारदार महिलेच्या तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणती दखल घेतली आहे याबाबत सविस्तर अहवाल तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा
महत्वाच्या जबाबदा-या सोपविल्यामुळे ते पुन्हा अर्जदार डॉक्टर महिलेस मानसिक त्रास देत असल्याची बाब शासनाला अवगत केली का याचा सविस्तर खुलासा सात दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना देण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




