आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 12 फेब्रुवारीला 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसर्या सामन्यात नामिबिया विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. भारताचा सामना गुरुवारी सर्वात शेवटी होणार आहे. त्याआधी कोणते 2 सामने होणार? कुणासमोर कुणाचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध ओमान
गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. श्रीलंका विरुद्ध ओमान यांच्यात ही लढत होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना आहे. श्रीलंकेने आयर्लंडवर मात करत विजयी सलामी दिलीय. तर ओमानला झिंबाब्वे विरुद्ध पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना श्रीलंका-ओमान सामन्यात उलटफेर पाहायला मिळणार का? याकडे लक्ष असणार आहे.
दिवसातील दुसरा सामना कधी?
गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात नेपाळ विरुद्ध इटली भिडणार आहेत. इटलीची वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर इटलीच्या तुलनेत नेपाळ अनुभवी संघ आहे. इटलीला आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलँड विरुद्ध पराभूत व्हावं लागलंय. नेपाळला आपला पहिला सामना अवघ्या 4 धावांनी गमवावा लागला. नेपाळने इंग्लंड सारख्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला पहिल्या सामन्यात घाम फोडला होता. रविवारी 8 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इंग्लंडने नेपाळ विरुद्ध फक्त नि फक्त 4 धावांनी विजय मिळवला होता.
त्यामुळे आता नेपाळ इटली विरुद्ध सामना जिंकून विजयाचं खातं उघडू शकते. नेपाळला विजय मिळवून सुपर 8 मधील आव्हान कायम ठेवण्याची संधी आहे. तसेच नेपाळने विजय मिळवल्यास त्यांना इंग्लंडला मागे टाकून सी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहचण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार सी ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज पहिल्या, स्कॉटलँड दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे आता इटली आणि नेपाळ सामन्यात कोण मैदानात मारतं? याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




