
Girish Bapat Death : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वसमावेशक नेता आणि भाऊ अशी त्यांची ओळख होती आणि पुण्यात त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यामुळेच त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांसह पुणेकरांनी गर्दी केली आहे.
पुण्यातील शनिवार पेठेत त्यांचं घर आहे. या घराच्या आवारत अनेक नागरिकांनी गर्दी केली आहे. 'गिरीश बापट अमर रहे', अशा घोषणा कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी देत आहे. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी गिरीजा, मुलगा गौरव आणि सून स्वरदा आणि नात असा परिवार आहे. त्यांचं सांत्वन करण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट दोघेही व्यवसायाने वकील आहेत. मुलगा राजकारणात सक्रिय नाही मात्र सून राजकारणात सक्रिय आहे. त्या पुण्यातील अनेक कार्यक्रमात हजेरी लावतात. शिवाय गिरीश बापट यांच्यासोबतही अनेक कार्यक्रमात त्या दिसत होत्या. बापटांच्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
कार्यकर्त्यांची गर्दी...
खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी तरुण कार्यकर्त्यांपासून तर गिरीश बापटांचं कार्य जवळून अनुभवणारे कसब्यातले ज्येष्ठ नागरिकांनीदेखील गर्दी केली आहे. त्यासोबतच महिलांनीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यांच्य़ा जाण्याने भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि पुणे पोरकं झालं आहे, असं म्हटलं जात आहे.
नेतेमंडळींनी घेतलं अंत्यदर्शन
गिरीश बापट यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेत्यांनीही गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे स्थानिक नेते आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीदेखील मोठी गर्दी केली आहे. अनेक नेत्यांनी साश्रु नयनांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.
कुटुंबियांचं सांत्वन...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक उपस्थित होते.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

