ठाणे: घोडबंदरकरांनो रस्त्याच्या दुरुस्तीमुळे अनेक मार्गिका बंद; जड वाहनांना प्रवेशबंदी

ठाणे: ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्यावर मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना दीड ते दोन तास
कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

दुरुस्ती आणि निर्बंध: गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारपासून हाती घेण्यात आले आहे. हे काम रविवारी (१२ जुलै) रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने शनिवार सायंकाळपासून काही मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत.

या कालावधीत सहा चाकी व त्यावरील सर्व जड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग: वाहतूक पोलिसांनी जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. जड वाहनांनी नाशिक रोड, खारेगाव टोलनाका, माणकोली व अंजूरफाटा या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन काशिमिरा वाहतूक पोलिसांनी केले आहे. ही दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *