
Dhule Farmer Death : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. धुळ्यात शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने 48 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
शेतात गहू काढत असणाऱ्या 48 वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, सोबतच शेतात काम करणारी 60 वर्षीय महिला सुदैवाने बचावली आहे. परंतु महिला देखील या घटनेत जखमी झाली असून महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील ही दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर नागराज मोरे असे 48 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना संध्याकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला.
यावेळी ज्ञानेश्वर मोरे हे आपल्या वृद्ध आत्त्या आणि इतर मजुरांसोबत त्यांच्या शेतातील गहू काढत होते. पाऊस येईल म्हणून त्यांची लगबग सुरू होती. परंतु तेवढ्यात काळाने घात केला आणि त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत ज्ञानेश्वर मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी त्यांच्यासोबत शेतात इतर मजूर देखील काम करत होते. त्यांनी ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांच्या वयोवृद्ध आत्या यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु ज्ञानेश्वर मोरे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या वृद्ध महिलेवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मावळात नागरिकांची तारांबळ
मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कांदा व गहू या पिकांचे नुकसान झाले असून सतत पडणाऱ्या पावसाने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. कालपासून आंदर मावळ, तळेगांव, देहूरोड, शेलारवाडी परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झालीये. दिवसा उन आणि रात्री पाऊस त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.
सिंधुदुर्गमध्ये अवकाळी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. सांयकाळी सह्याद्रीलगत असलेल्या माणगाव खोऱ्यातील काही गावात व कणकवलीतील फोंडाघाट परीसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि गारांचा मुसळधार पाऊस यामुळे नागरींकाची चांगलीच तारांबळ उडाली. गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा परीणाम आंबा व काजू पिकावर होण्याची शक्यता आहे.
शहर
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
महाराष्ट्र
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
गुन्हा
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
राजकीय
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
























Subscribe to my channel



