Crime News : लातूर-बार्शी महामार्गावर युवकांनी माजवली काेयताने दहशत, एकास अटक

Crime News : लातूर शहरात हातात कोयता घेऊन दोन युवकांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. युवकांचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. पाेलिसांनी त्या आधारे एका युवकाला ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या युवकाचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार लातूर-बार्शी महामार्गावर दोन युवकांनी हातात कोयता घेऊ दहशत माजवली. युवकांनी काही गाड्यांच्या काचा देखील फोडल्या. युवकांचा हातात कोयता घेऊन फिरतानाचा एक व्हिडिओ सीसीटीव्ही कमॅरेामध्ये कैद झाला आहे.

CM Eknath Shinde : 'ते' सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत फिरताहेत; राहुल गांधींचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

यामध्ये युवक हातात कोयता घेऊन महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला. या दोन्ही युवकांवर लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या फुटेजनूसार तोहिद अकबर पठाण (वय 21) या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील अन्य युवक वैभव उर्फ (मोन्या) बनसोडे (वय 18) याचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *