Congress Answer to Eknath Shinde: राहुल गांधींची सभा अन् शिवसेनेचा काळा दिवस; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

 

Congress Answer to Eknath Shinde :  भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची जोरदार सभा झाली. या सभेला उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेसाठी हा काळा दिवस आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा आता काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. थोरात म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकशाहीकडं बघण्याचा दृष्टीकोन काय आहे हे समजतं त्यांच्याविधानावरुन. ही लोकशाही आहे, त्यामुळं लोकसभेची महत्वाची निवडणूक सुरु झाली आहे तर त्याचा सभा घेणं एक महत्वाचा भाग आहे. लोकांशी संवाद करण्याला ते काळा दिवस म्हणतात, त्यामुळं त्यांनी अत्यंत दुर्देवी विधान केलेलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं?

राहुल गांधींच्या सभेची काल जोरदार तयारी सुरु होती. या तयारीवरुन भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. कारण ज्या शिवतीर्थावरुन बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं त्याचं ऐतिहासिक मैदानात ज्यांनी सावरकरांवर आरोप केले त्यांच्यासोबत सभा घेण्याची वेळ आली आहे हे दुर्देवच आहे. आज गर्व से कहो हम हिंदू है हे कसं बोलणार? हा देखील प्रश्नच आहे.

Congress Answer to Eknath Shinde: राहुल गांधींची सभा अन् शिवसेनेचा काळा दिवस; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

हिंदुहृदयसम्राट बोलायला पण काही लोक घाबरत आहेत. त्यामुळं मला वाटतं की, बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल. आमश्या पाडवींसारखे अनेक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या विचारधारेच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळं आमच्याकडं बाळासाहेबांचे विचार आहेत तर तिकडं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply