पुणे : वारजेजवळ भीषण अपघात! तरूणाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू

पुणे : पुणे-बंगळूरू महामार्गावर वारजे जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकल्प चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संकल्प चव्हाण हा वारजेहून धायरीच्या दिशेने दुचाकीवर जात असताना हा अपघात झाला आहे. दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की चव्हाण थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान वारजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *