
पुणे : करोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी देहूतून पंढरपूपर्यंत पायी मार्गस्थ होणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालख्या पायी मार्गस्थ होणार आहेत. मात्र, करोनामुळे गेली दोन वर्षे वाहनाने पालख्या पंढरपूरला गेल्याने पालखी तळांवर अनेक कामे बाकी आहेत. याबाबत आळंदी आणि देहू संस्थानांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालखीतळ, विसावा या ठिकाणची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याची तंबी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला बुधवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात देहू आणि आळंदी संस्थानांच्या प्रमुखांसोबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठक घेतली. त्यामध्ये हे आदेश दिले. करोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने पायी सोहळा निश्चित झाला असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी २१ जून रोजी आळंदीतून, तर संत तुकाराम महाराज पायी पालखी २० जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. गेली दोन वर्ष पालखी प्रस्थान सोहळा झाला नसल्याने यंदाच्या वर्षी मोठय़ा प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप पालखीतळ, विसावा ठिकाणे आणि महामार्गावरील कामे पूर्ण झाली नसून अनेक समस्या कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
याबाबत बोलताना आळंदी संस्थानचे अॅड. विकास ढगे पाटील म्हणाले, ‘आळंदीत इंद्रायणी नदीतील जलपर्णी मोठय़ा प्रमाणात असून ती काढण्यात यावी, अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आली. पालखीमार्गावरील अपूर्ण रस्ता, विसावा ठिकाणची दुरवस्था, अपूर्ण बांधकाम, आजूबाजूला असलेला राडारोडा, अर्धवट डांबरीकरण आदी समस्या दूर करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. पालखी सोहळय़ादरम्यान मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास वाव मिळेल एवढी मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढल्यास वारकऱ्यांची मंदिरात गर्दी होणार नाही, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.’
* उरुळी देवाची, वडकी नाला, पवार वाडी, सासवड, बोरावके मळा, यमाई शिवरी, साकुर्डे, जेजुरी, पिंपरे खुर्द विहीर, लोणंद, सुरवडी, निंभोरे ओढा आदी विसाव्याच्या ठिकाणी अर्धवट कामे असून राडारोडा आहे त्या अवस्थेतच पडला आहे. अनेक ठिकाणी विसाव्याचे पटांगण सपाटीकरण राहिले आहे. अर्धवट रस्ते आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या राडारोडामुळे पाऊस पडल्यास अपघाताची शक्यता आहे. नीरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले आहेत. सासवड-जेजुरी दरम्यान असलेल्या पुलाचे काम अद्याप अर्धवट आहे.
* जेजुरी-वाल्हे रस्ता रुंदीकरण रखडले असून वळणामुळे अपघाताच्या समस्या कायम आहेत. तेथील उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पालखी नियोजनासंदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी पातळीवर दोन बैठका पार पडल्या आहेत. पालखीमार्गावरील अपूर्ण रस्त्यांबाबत, विसावा असणाऱ्या ठिकाणी संबंधित प्रांत, तहसीलदार यांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व कामे येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जादा तात्पुरती शौचालये आणि अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शहर
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
महाराष्ट्र
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
गुन्हा
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.

























Subscribe to my channel



