
Chhattisgarh : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झालीय. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. तसेच पीडिया जंगलात माओवाद्यांनी उभारलेला तात्पुरता तळ उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी घटनास्थळावरुन मोठ्याप्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. तर भूसुरुंग स्फोटामुळे दोन जवान जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.
भीषण चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्थान
देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने नक्षलग्रस्त भागात गेल्याकाही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांचा वावर वाढला असल्याचे समोर आले आहे. या नक्षलवाद्यांच्या कारवाई विरोधात पोलिसांनी देखील आपली कंबर कसली असून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींकडे पोलीस लक्ष देऊन आहे. अशाच एका मोठ्या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे.
|
|
गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या माओवादी विरोधी मोहिमेअंतर्गत 8 मे रोजी प्रतिबंधित सीपीआय माओवादी संघटना (PLGA) कंपनी क्रमांक 2 कमांडर वेल्ला, गांगलूर क्षेत्र समितीचे सचिव दिनेश मोदियाम आणि इतर 100-150 सशस्त्र माओवाद्यांना अटक करण्यात आली. गंगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पीडियाच्या जंगलात, डीआरजी विजापूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी सुकमा, बस्तर फायटर, एसटीएफ आणि कोब्रा 210, 202, 85 सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने ही माओवादीविरोधी कारवाई केली होती.
नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त
त्यानंतर या परिसरात शोध मोहिमेदरम्यान, 10 मेच्या सकाळी 6 वाजताच्या सुमारास पीडिया जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर घटनास्थळावरून 12 माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. तर बीजीएल लाँचर, 12 बोअरची बंदूक, देशी बनावटीची रायफल, बीजीएल सेल, प्रचंड प्रमाणात स्फोटके, माओवाद्यांचा गणवेश, काठी, औषधे, प्रतिबंधित माओवादी संघटनेचे प्रचार साहित्य आणि माओवादी साहित्य हे देखील घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या परिसरात अधिक शोध घेत आहेत.
या आधीच्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले
या आधी 30 एप्रिल रोजी बस्तर पोलिसांना नारायणपूर चकमकीत मोठे यश मिळाले होते. नक्षलवादी आणि जवानांमध्ये सुमारे 9 तास चाललेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. 29 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सैनिक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात शोधासाठी निघाले होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर 30 एप्रिलला सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांचा अबुझमाडमधील ताकामेटाच्या जंगलात नक्षलवाद्यांशी सामना झाला. त्यामध्ये 10 नक्षलवादी मारले गेले तर घटनास्थळावरून एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




