Chandrapur Mayor: भाजप की ठाकरेसेना, चंद्रपुरच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार?

image

चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर आज ठरणार आहे. महापौरपदासाठी आज दुपारी ११ वाजता महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, भाजप, ठाकरेंची शिवसेना यांनी या पदावर दावा केला असून, अंकांची जुळवाजुळव करण्यात सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. महापालिकेत काँग्रेस २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्यापाठोपाठ २३ जागा भाजपच्या आहेत. तर ठाकरेसेनेचे वंचितसह आठ सदस्य आहेत. सत्तेचे गणित ठाकरे सेनेच्या हाती असल्याने महापौर पद आम्हाला द्या, अशी ठाम भूमिका ठाकरेसेनेने घेत इतरांना पाठिंबा देण्यास नकार दिला. पण तरीही या सेनेची चर्चा काँग्रेस आणि भाजपसोबत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. यावर आता कोणता तोडगा निघतो, हे सभागृहात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर पदाचे चित्र अजूनही धूसर आहे.



विडियो गॅलेरी

1 thought on “Chandrapur Mayor: भाजप की ठाकरेसेना, चंद्रपुरच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार?

Leave a Reply to Amalia175 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *