मुंबई : भारतीय रेल्वेचा कणा असलेल्या मध्य रेल्वेने 'झिरो स्क्रॅप मिशन' (Zero Scrap Mission) अंतर्गत भंगार विक्रीतून एक अत्यंत उल्लेखनीय व मोठी कामगिरी फत्ते केली आहे. मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत निरुपयोगी भंगार साहित्याची विक्री करून तब्बल ३२३.५० कोटी रुपयांचा घसघशीत महसूल गोळा केला आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ सप्टेंबर महिन्यातच ७०.४२ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री नोंदवली गेली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, रेल्वेचे विविध यार्ड, रेल्वे वर्कशॉप्स, डेपो आणि ट्रॅकच्या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पडून असलेले जुने, कालबाह्य आणि निरुपयोगी साहित्य शोधून काढून त्यांची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला होता. 'स्वच्छता ही सेवा २०२६' या विशेष मोहिमेदरम्यान १७ सप्टेंबरपासून मध्य रेल्वेने तब्बल ४,८८४ मेट्रिक टन भंगाराची यशस्वी विल्हेवाट लावली. या केवळ एकाच मोहिमेतून रेल्वेला ४४.२४ कोटी रुपयांचे मूल्य प्राप्त झाले. याशिवाय, चालू आर्थिक वर्षामध्ये सप्टेंबरपर्यंत सुमारे ४६.८५ मेट्रिक टन ई-कचऱ्याची (E-Waste) देखील यशस्वी विक्री करण्यात आली असून, याद्वारे रेल्वेच्या तिजोरीत १.११ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे.
रूळ, स्लीपर आणि इंजिनांचा भंगार विक्रीमध्ये समावेश मध्य रेल्वेने विकलेल्या या विशाल भंगारामध्ये प्रामुख्याने २९,९९३ मेट्रिक टन रेल्वे रूळ (Rails) व परमनंट-वे भंगार, तब्बल १ लाख ७२ हजार १९५ लोखंडी व सिमेंटचे स्लीपर, १५,५४७ मेट्रिक टन लोहयुक्त (Ferrous) भंगार, तसेच १,९९९ मेट्रिक टन लोहविरहित (Non-Ferrous) विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. जुने आणि पडून असलेले हे सर्व भंगार रेल्वे परिसराबाट हटविल्यामुळे रेल्वेचे विविध यार्ड, डेपो आणि कारखान्यांच्या (वर्कशॉप) परिसरातील शेकडो एकर जागा मोकळी झाली आहे. परिणामी, रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता आणि प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत झाली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भुसावळ विभाग महसूल वसुलीत ठरला आघाडीवर मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमधून झालेल्या या भंगार विक्रीमध्ये भुसावळ विभागाने संपूर्ण मध्य रेल्वेत बाजी मारत सर्वाधिक ५७.२७ कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची नोंद केली आणि ते प्रथम क्रमांकावर राहिले. त्यापाठोपाठ मुंबई विभागाने ५२.०८ कोटी रुपये, पुणे विभागाने ४७.५५ कोटी रुपये, नागपूर विभागाने ४६.०८ कोटी रुपये, तर सोलापूर विभागाने १४.६९ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री केली. याशिवाय उर्वरित महसूल मध्य रेल्वेच्या इतर वेगवेगळ्या डेपोमधून प्राप्त झाला आहे. रेल्वे नेटवर्कवर 'झिरो स्क्रॅप स्टेटस' पूर्णपणे साध्य करण्यासाठी सर्व मंडळे, विभाग आणि डेपोमध्ये भंगाराची अचूक ओळख पटवणे, त्याचे शास्त्रोक्त वर्गीकरण करणे आणि विहित नियमांनुसार विल्हेवाट लावण्याची मोहीम सातत्याने राबवली जात आहे. यामुळे एकीकडे रेल्वेची स्वच्छता राखली जात असून दुसरीकडे निरुपयोगी आणि पडिक साहित्यातून भरघोस महसूल निर्मिती होत आहे.
शहर
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


