Blood Donation : लातूर, नांदेडमध्ये रक्ताचा तुटवडा, रक्तदात्यांसह, सामाजिक संस्थांना रक्तदानाचे आवाहन

Blood Donation : नांदेड आणि लातूर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये तसेच रुग्णालायत रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच आचारसंहिता आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबीर आयाेजन हाेत नसल्याने रुग्णांसाठी अन्य जिल्ह्यातून रक्त उपलब्ध करावे लागत आहे. परंतु त्यासाठी माेठा खर्च पडत आहे. दरम्यान सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्त संकलन, रक्तदान शिबीरासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. 

नांदेडकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा

नांदेड शहरात एकूण 10 रक्तपेढ्या आहेत. दररोज या सर्व रक्तपेढींना जवळपास 300 रक्ताच्या पिशव्या लागतात. सध्या उन्हाळा असून उन्हाळ्यात रक्तदान शिबीरे खूप कमी प्रमाणात होत आहेत.

Dhule Crime : नशेखोरीसाठी गाड्या अडवून चाकूचा धाक दाखवत वसुली; दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे वाढदिवस आणि या कार्यक्रमा निमित्त होणारे रक्तदान शिबीरे रद्द झाली आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लातूरला रक्ताचा तुटवडा

लातूर जिल्ह्यातदिवसेंदिवस वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील रक्त संकलन केंद्रांमध्ये जवळपास सर्वच ब्लड ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. थैलेसीमिया, पॉलीसिथेमिया, अशा रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांना ब्लड चढवण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील सर्वच सामाजिक संस्था, संघटना आणि रक्तदाते यांनी रक्तदान शिबीर घ्यावे असे आवाहन रक्त संकलन केंद्रांकडून करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply