
Samruddhi Mahamarg : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. ८) भीषण अपघात झाला. सुसाट वेगात जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (वय ३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (वय ४०) यांचा समावेश आहे. तर, रितेश भानादकर (वय २४) आणि आशिष सरवदे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
|
|
विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते.
तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर हर्सुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक ४३६ वर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चुराडा झाला.
अपघातामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले.
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!


























Subscribe to my channel




