Bachchu Kadu : बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Nashik Bachchu Kadu News : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.

2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. यावेळी बच्चू कडू तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. तसेच शिवीगाळ केली होती. या प्रकरणी बच्चू कडू यांना आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

2017 साली नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना संरक्षण देत आमदार बच्चू कडू यांना बाजूला केले होते. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही घबराट पसरली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply