Cyber scam: व्हिडीओ कॉलवर महिलेला विवस्त्र होण्यास सांगितले; मग पैसे उकळले, कोणती भीती दाखवून होते सायबर फसवणूक?

Cyber scam: सायबर घोटाळ्याबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत असतानाही त्याच प्रकारच्या सायबर फसवणुकीला लोक आताही बळी पडत आहेत. शेअर ट्रेडिंग, मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झाला आहे किंवा तुमच्या घरातील मुलगा किंवा मुलगी एका प्रकरणात अडकले असल्याची बतावणी करून सायबर चोरटे अनेकांना गंडा घालत आहेत. विशेष करून उच्चशिक्षित लोकही अशा फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसते. मुंबईतील महिला वकिलाची अशाच प्रकारे फसवणूक झाली असून चोरट्यांनी पैशांसह या महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओही मिळवले आहेत.

प्रकरण काय आहे?

मुंबईतील ३६ वर्षीय वकिल महिलेला बुधवारी दुपारी एक कॉल आला. ज्यामध्ये तिच्याविरोधात एफआयआर दाखल झाला असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित एका प्रकरणात या महिला वकिलाचेही नाव गुंतले असल्याचे तिला सांगण्यात आले. नरेश गोयल यांना ईडीने आर्थिक घोटाळ्यात अटक केली होती, मात्र ते आता जामीनावर बाहेर आहेत.

गोपनीय चौकशी करायची असल्यामुळे आणि पोलीस स्थानकात येण्यापेक्षा त्रयस्थ ठिकाणी चौकशी करू, असे सांगून या महिलेला पवई येथील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले गेले. तिथे गेल्यावर एका महिला अधिकाऱ्याकडून पीडित महिलेच्या शरीरावरील जखमा आणि काही शस्त्र बाळगले आहे का? याची खातरजमा करण्यासाठी पीडितेला विवस्त्र होण्यास सांगितले गेले. तसेच तिच्या खात्यातून ५० हजार रुपये चोरट्यांनी आपल्या खात्यात वळविण्यास सांगितले.

Pune : जिल्हा मध्यवर्ती बंँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना जन्मठेप

हा प्रकार सुरू असताना महिलेला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यानंतर तिने थेट पवई पोलीस गाठले. सायबर चोरट्यांच्या कॉल आणि मेसेजला उत्तर न दिल्यामुळे अखेर चोरट्यांनी तिचे नग्न फोटो तिलाच पाठवून आणखी पैशांची मागणी करायला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलेला पहिला फोन आला तेव्हा, समोरच्या व्यक्तीने तो TRAI मधून बोलत असल्याचे सांगितले होते. पीडितेचे सीम कार्ड मनी लाँडरिंग प्रकरणात वापरले गेले असून ते लवकरच ब्लॉक केले जाणार असल्याची भीती दाखविली.

महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, पहिला फोन आल्यानंतर मला पवई सायबर सेलमधून दुसरा फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानेच मला अटक टाळण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मी घाबरले, अटक होण्याची भीतीने हॉटेलमधील रुम बुक करून तिथे गेले, असे पीडितेने सांगितले. हा फसवणुकीचा प्रकार होत असताना महिलेला याबद्दल कुणालाही माहिती न देण्याची भीती दाखवले.

पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित महिलेने ज्या बँक खात्यात पैसे वळते केले, त्याची माहिती मिळविली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Cyber scam: व्हिडीओ कॉलवर महिलेला विवस्त्र होण्यास सांगितले; मग पैसे उकळले, कोणती भीती दाखवून होते सायबर फसवणूक?”

  1. Heya i am for the firdt time here. I found this board andd I find It really useful & it helped mee oout
    a lot. I hooe to giive something back and aid others like you aided
    me. xnxx

    Feel free to visit myy webpage homepage (Princess)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *