महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाला घेऊन आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आणि तपासाला गती मिळावी यासाठी अजित पवार यांचे सुपुत्र तथा युवा नेते जय पवार यांनी बुधवारी पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) कार्यालयाला भेट दिली. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची प्रगती, गोळा केलेले अहवाल आणि तांत्रिक बाबींची सखोल माहिती जाणून घेतली.
लाखो लोकांच्या विश्वासाचा आणि सत्याचा प्रश्न:
CID अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर बोलताना जय पवार यांनी स्पष्ट केले की, "अजित दादांच्या विमानाचा अपघात केवळ एका कुटुंबासाठी दुःखाचा विषय नसून, त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो-कोटी नागरिकांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे." या दुर्घटनेमागील नेमके सत्य काय आहे, तांत्रिक बिघाड होता की घातपात, हे सर्व कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर समोर आले पाहिजे, असे सांगत त्यांनी तपासात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. जोपर्यंत या अपघाताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत कुटुंबीयांकडून पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रकरणाची पार्श्वभूमी व तपास यंत्रणेची भूमिका:
या वर्षाच्या सुरुवातीला (जानेवारी २०२६) बारामती विमानतळाजवळ चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात अपमृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली होती, जी नंतर पुढील सखोल तपासासाठी सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात आली. सीआयडी प्रमुख सुनील रामानंद आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जय पवार यांना आतापर्यंत केलेल्या तपासाची सविस्तर माहिती दिली. दुसरीकडे, या आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवत उच्चस्तरीय व पारदर्शक चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे आता सीआयडीच्या तपासाला अधिक वेग येणार असून सर्वांचे लक्ष या प्रकरणाच्या अहवालाकडे लागले आहे.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



