पुणे: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूरनं रिअल इस्टेट क्षेत्रात आपली नवी आणि मोठी गुंतवणूक केली आहे. अयोध्येतल्या रामनगरीत कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्यानंतर, आता रणबीरनं महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तब्बल २५.७ एकर जमीन खरेदी केली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील 'सीआरई मॅट्रिक्स' (CRE Matrix) या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, रणबीरनं या खरेदीसाठी १६.४२ कोटी रुपये मोजले आहेत.
मुळशी तालुक्यातील पिंपरी गावात व्यवहार:
हा व्यवहार पुण्याच्या प्रसिद्ध व निसर्गरम्य मुळशी तालुक्यातील पिंपरी गाव येथे झाला आहे. मुळशी हा भाग निसर्गसौंदर्य, धरण परिसर आणि लक्झरी वीकेंड होम किंवा रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. रणबीरनं येथे एकमेकांना लागून असलेले चार मोठे जमिनीचे तुकडे (प्लॉट्स) खरेदी केले आहेत. या चारही जमिनींचे एकूण क्षेत्रफळ १,०४,००० चौरस मीटर (सुमारे २५.७ एकर) आहे. हा व्यवहार ३० एप्रिल २०२६ रोजी नोंदणीकृत झाला असून, यासाठी रणबीर कपूरने ८२.१३ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरले आहे.
पुढील नियोजनाबद्दल चर्चा:
रणबीर या जमिनीवर आलिशान फार्महाऊस बांधणार की, एखादा मोठा कमर्शियल प्रोजेक्ट उभा करणार, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. जरी रणबीरनं ही जमीन नेमकी कोणत्या कारणासाठी खरेदी केली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुळशी परिसरातील जमिनींचे वाढते मूल्य पाहता, येथे एखादा प्रायव्हेट व्हिला, वेलनेस रिसॉर्ट किंवा फार्महाऊस उभारण्याचा त्याचा मानस असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सेलिब्रिटींचा ट्रेंड:
रणबीर कपूरनं अवघ्या काही महिन्यांपूर्वी मे २०२६ मध्ये अयोध्येतील 'द सरयू' (The Saryu) या हाय-प्रोफाइल प्रोजेक्टमध्ये २,१३४ चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता, ज्याची किंमत ३.३१ कोटी रुपये होती. त्यानंतर लगेचच त्याने पुण्यात ही मोठी गुंतवणूक केली आहे. आजकाल बॉलिवूड कलाकारांमध्ये मुंबईबाहेर मोकळ्या जमिनी, हॉलिडे होम्स आणि शेतजमीन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. अमिताभ बच्चन, विराट कोहली-अनुष्का शर्मा, क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी अलिबाग, लोणावळा, गोवा आणि पुणे अशा ठिकाणी मोठी गुंतवणूक केली आहे.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




