मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) दोन दिवसीय शताब्दी समारोह आयोजित करण्यात आला होता. हा समारोह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सलमान खान, रणबीर कपूर यांसारखे सुपरस्टार हजर होते. तर दुसऱ्या दिवशी रविवारी विकी कौशल आणि अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली. संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींनी सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण मन:पूर्वक ऐकलं होतं.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेता विकी कौशल पारंपरिक अंदाजात दिसून आला. कुर्ता-पायजमा परिधान करून तो त्याच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातील खास लूकमध्ये दिसला. तर अनन्या पांडेसुद्धा पारंपरिक पोशाख परिधान करून या कार्यक्रमात उपस्थित राहिली. याशिवाय निर्माता – दिग्दर्शक करण जोहर, मधुर भंडारकार, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, सुभाष घई, रवीना टंडन आणि जॅकी श्रॉफ यांसारखे बरेच सेलिब्रिटी याठिकाणी दिसले.
दुसरीकडे पाकिस्तानला सोडून भारताचं नागरिकत्व स्वीकारणारा गायक अदनान सामी याने सोशल मीडियावर मोहन भागवत यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी, रुपाली गांगुली आणि रमेश तौरानी हेसुद्धा दिसत आहेत. या फोटोंसोबत अदनानने लिहिलं, ‘आरएसएसचे दिग्गज सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत उत्तम वेळ घालवला. त्यांचं भाषण मला खूप आवडलं आणि त्यांनी बरेच गैरसमजसुद्धा दूर केले. मिथकांबद्दलही त्यांनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि ते दूर केले. अत्यंत अविश्वसनीय सज्जन आणि सुंदर व्यक्ती.’
Had an incredible afternoon with the legendary Sarsanghchalak (Chief) of RSS, Sri Mohan Bhagwat ji. It was delightful to hear him speak and there were so many myths & misconceptions that he so eloquently explained & cleared. An incredible gentleman & beautiful soul… pic.twitter.com/rL3zQqA4cX
— Adnan Sami (@AdnanSamiLive) February 8, 2026
करण जोहरने सोशल मीडियावर लिहिलं, ‘मी इथे आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आलो आहे आणि इथे मोहन भागवत यांचं भाषण ऐकलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे शब्द फक्त प्रेरणादायीच नव्हे तर त्यात दमदार विनोदबुद्धीही होती.’
#WATCH | Mumbai, Maharashtra: On RSS’ Two-Day Lecture Series on ‘100 Years of Sangh Journey’, Producer Karan Johar says, “… I came here on the occasion of 100 years of the RSS and heard Mohan Bhagwat’s insightful lecture. I extend my best wishes to the RSS on its 100th… pic.twitter.com/3qKFif5DU2
— ANI (@ANI) February 8, 2026
अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी तिथे उपस्थित होता. तोसुद्धा मोहन भागवतांच्या भाषणाला हजर होता. यावेळी सामाजिक ट्रेंड आणि फॅशनच्या प्रभावाविषयी बोलताना भागवत म्हणाले की, समाजातील लोक अनेकदा प्रभावशाली लोकांकडे पाहून ट्रेंड फॉलो करतात. यावेळी त्यांनी सलमानचं उदाहरण दिलं. “कॉलेजमधील विद्यार्थी तसेच कपडे घालतात, जसे सेलिब्रिटी घालतात. त्यांना कारण माहीत नसलं तरी ते फॅशन फॉलो करतात. फॅशन तयार करणारे लोक समाजात विश्वासार्ह आणि आदरणीय मानले जातात”, असं ते पुढे म्हणाले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




