मी तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार; चंद्रकांत पाटलांचं पवार घराण्याला डायरेक्ट चॅलेंज

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे काही आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी त्यांच्यावर काल, शनिवारी पुण्यात शाईफेक केली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शाईफेकीच्या घटनेमागे शरद पवारांचा हात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता.

शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले होते. यावेळी ते त्यांनी पवार कुटुंबियांना आवाहन दिलं आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी मला वारंवार टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपतं. पवार घराणं, ठाकरे घराणं मला टार्गेट करते. संजय राऊत, आदित्य ठाकरे, नव्याने आलेल्या सुषमा अंधारे मला टार्गेट करतात. यांना महाराष्ट्रात घराणेशाही आणायची आहे.

रोहित पवार यांनी गेले २ ते ३ दिवस वातावरण बिघडवलं असा आरोप करत रोहित पवारांनी आंबेडकर वाचले आहेत का? रोहित पवार माझ्या समोर येऊन बसा असं ते म्हणाले. तसेच मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असं थेट आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्याला दिलं आहे.

यावेळी त्यांनी एका पत्रकारावरही आरोप केला आहे. बरोबर शाही फेकतानाच कसा पत्रकाराला अॅंगल मिळाला? त्या पत्रकारावर कारवाई झाली नाही तर मी आंदोलनाला बसेल. हा काही पत्रकारितेला शोभणार विषय नाही. ही वृत्ती मोडून काढावी लागेल. मी अपील केलंय की कुणी काही करायचं नाही. उद्या पंतप्रधान मोदी राज्यात आहे म्हणून हे सगळं चाललंय असं पाटील म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply