कात्रज : जुन्या बोगद्यात मोटारगाडीने घेतला पेट

खेड-शिवापूर - कात्रज जुन्या बोगद्यात गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने पेट घेतला. सुदैवाने या मोटारीत असलेले तिघेजण ताबडतोब बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे अर्ध्या तासात आग विझवली.

राजगड पोलिस आणि अग्निशामक दलाने याबाबत माहिती दिली. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक मोटारगाडी पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने चालली होती. यावेळी कात्रज जुन्या बोगद्यात प्रवेश करताच मोटारगाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. त्यामुळे मोटारीनेही पेट घेतला. या मोटारीत असलेले तिघे जण ताबडतोब बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. मात्र या आगीत संपूर्ण मोटारगाडी जळून खाक झाली.

या घटनेची माहिती मिळताच पुण्यातील अग्निशामक दलाचा बंब ताबडतोब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे वीस मिनिटात पेटलेल्या मोटारगाडीची आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कात्रज जुन्या बोगद्यातून पुण्याकडे आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर पेटलेल्या मोटारीची आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही बाजुची वाहतूक बोगद्यातून सोडण्यात आली.



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *