डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. मात्र रस्त्यांची कामे अद्याप सुरु झाली नसल्याने मनसे शिवसेनेवर टिकास्त्र करण्यात येत आहे. कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा अशी खोचक टिका करणारा बॅनर एमआयडीसी मध्ये लागले होते. त्यानंतर शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करीत शिवसेनेने आता अभिनंदनाचे बॅनर लावा असा चिमटा व्यासपीठावर काढला होता. भूमिपूजन होऊन महिना उलटला मात्र अद्याप रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेचे अभिनंदन करणारा उलटा बॅनर मनसेच्यावतीने होळीच्या मुहूर्तावर लावण्यात आला असून जेव्हा प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल तेव्हा अभिनंदनाचा सरळ बॅनर लावू असे आवाहन आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची काम गेले अनेक वर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला असून 20 वर्षापासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आणि त्याचे बॅनरदेखील या भागात लागले होते. बॅनर लागून सहा सात महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने यावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे बॅनर तीनदा फाटले पण काम झाले नाही असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून खासदार शिंदे यांना लगावला होता. तसेच मनसेने शिवसेनेला ट्रोल करीत ''कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा'' असा संदेश देणारे फलक एमआयडीसीत लावले होते. त्यानंतर 17 फेब्रुवारीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांसह मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते. त्यावेळी खासदार शिंदे यांनी वचनपूर्ती केली आता अभिनंदनाचे बॅनर लागले पाहीजे अशी कोपरखळी मारली होती. त्यावर चांगले काम केले तर कौतुक नक्कीच करणार असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले होते.
मनसे आमदारांनी केले ट्विट
त्यानुसार अभिनंदनाचे बॅनर लावण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात काम सुरु होण्याची वाट पहात होतो. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन एक महिना झाला मात्र कामास अद्याप सुरुवात झालेली नसल्याने होळीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला पुन्हा ट्रोल केले आहे. आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केले असून गेल्या महिन्यात याच दिवशी एमआयडीसी विभागातील रस्त्यांच्या काॅंक्रीटीकरणाच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घान झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते पण अजून काम चालू झाले नाही. काम सुरु करुन लवकरच हे बॅनर सरळ करुन लावायची संधी द्यावी ही विनंती अशी ट्विट आमदार पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
उलट्या बॅनरवर नक्की काय
आम्ही अभिनंदन केले, तुम्ही काम कधी करणार? असा सवाल करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच एमआयडीसी परिसरातील रस्ते लवकरात लवकर व्हावेत यासाठी प्रयत्न केलेल्या लोकप्रतिनिधी व नागरिकांचे मनसे अभिनंदन असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
याविषयी आमदार राजू पाटील म्हणाले, एमआयडीसीतील रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे उदघाटन मोठ्या जोरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्याआधीच मी बोललो होतो की काम चालू करा नागरिकांना त्रास होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला अभिनंदनाचे बॅनर लावावे लागतील असे सांगितले होते. त्यावर काम सुरु केल्यावर आम्ही तुमच्या अभिनंदनाचे बॅनर नक्की लावू असे आश्वासन मी त्यांना दिले होते. त्यानुसार बॅनर तयार करुन ठेवले आहेत. महिना उलटला काम काही चालू झालेले नाही. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे, त्या अनुषंगानेच होळीचे निमित्त साधून व एक महिना पूर्तीनिमित्त एक उलटा बॅनर लावला आहे. खाली डोके वर पाय करुन तो वाचावा लागेल नागरिकांना. काम सुरु झाले की हे बॅनर आम्ही सरळ करु.
ग्राम पंचायतची कामे ही आपण केले आहे, असे लोकांना सांगायचे आणि कुठेतरी आम्ही कामे करतोय असे भासवायचे. मानपाडा रस्त्याचे काम मी स्वतः पीडब्ल्यूडी खात्याकडे पाठपुरावा करुन जो राज्य शासनाकडे विभाग येतो त्याच्याकडे पाठपुरावा करून आणले, त्या काम देखील ते आम्ही केल्याचे सांगतात. आमची हरकत नाहाी, कदाचित ठेकेदारावर प्रभाव टाकण्यासाठी अश्या गोष्टी होत असतील ते त्यांनी करावे परंतु कामे लवकर चालू करावी हीच आमची अपेक्षा आहे असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.हे पण वाचा-
शहर
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
महाराष्ट्र
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- नांदेड: सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न करणारी आंचल सासर सोडून निघून गेली; ताटे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


