
Pune : ससाणेनगर रस्त्याच्या नव्या कालव्यावरील पूल धोकादायक झाल्याचे उघड होवून तीन महिने उलटून गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पुलावरील काही भागावर पत्रे लावून वाहतूक एकेरी केली आहे. मात्र, पुलाच्या दुरूस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने प्रवाशांना धोकादायकपणे प्रवास करावा लागण्यासह वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. येथील नव्या मुठा कालव्यावरील पुलाचा एक खांब ढासळला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला आहे. हा धोका लक्षात घेवून पालिकेने तकलादू झालेल्या खांबावरील रस्त्याच्या भागात पत्रे लावून रस्त्यावरील भागात वाहतुकीला वळण दिले आहे.
असे असले तरी रात्री-अपरात्री वाहन धडकून थेट कालव्यात कोसळण्याचा धोका येथे निर्माण झाला आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून ही परिस्थिती येथे आहे. पालिका प्रशासनाकडून याची दुरुस्ती कधी होणार, असा सवाल प्रवाशांकडून सध्या केला जात आहे. ससाणेनगर, काळेबोराटेनगर, ससाणेवस्ती, चिंतामणीनगर व सातवनगर, सय्यदनगर, हांडेवाडी, होळकरवाडी, महंमदवाडी, उंड्री पिसोळी आदी भागातील नागरिकांकडून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. विकास आराखड्यातील डीपी रस्ते रखडल्याने व जवळचा पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना येथूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पालिकेने विशेष बाब म्हणून तातडीने या पुलाचे काम करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
|
Nashik : सामूहिक आत्महत्याने नाशिक हादरले, एकाच कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवले |
कमकुवत झालेला हा पूल १९६२ साली बांधण्यात आला आहे. त्याच्या शेजारी सिमेंटचा पिलर आहे, मात्र दगडी खांबाचे एक एक दगड बाहेर पडू लागले आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
"स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक झाल्याचे दिसून आले आहे. तज्ञ एजन्सीकडून त्याच्या दुरूस्तीचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी ६८ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. जाहिरात देवून निविदा मागविण्यात येतील. त्यानंतर खर्चाला मंजूरी घेवून व पाटबंधारे विभागाचे शेड्युल घेवून महिनाभरात काम सुरू केले जाईल. पर्यायी मार्ग व वाहतुकीचेही नियोजन करावे लागणार आहे.'
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




