आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या समस्येचा सामना करतोय. चेक बाऊन्स प्रकरणात त्याने स्वत:ला दिल्लीतल्या तिहार तुरुंगात सरेंडर (आत्मसमर्पण) केलं आहे. आत्मसमर्पण करण्याआधी तो तुरुंगातील अधिकाऱ्यांसमोर भावूक झाला होता. “माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय आणि दुसरा कोणता मार्गही मला दिसत नाहीये”, असं तो म्हणाला होता. या संकटकाळात आता अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतीला धावून आला आहे. इतकंच नव्हे तर त्याने इंडस्ट्रीतील इतरांनाही राजपालची मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
सोनू सूदची पोस्ट-
‘राजपाल यादव हा अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे, ज्याने आपल्या इंडस्ट्रीत गेल्या अनेक वर्षांपासून अविस्मरणीय योगदान दिलं आहे. कधीकधी आयुष्य आपल्या अन्याय्यपणे वागतं, प्रतिभेमुळे नाही तर आपली वेळ क्रूर असू शकते. तो माझ्या चित्रपटाला भाग असेल आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी.. निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि सहकाऱ्यांनी एकत्र यावं. एक छोटीशी साइनिंग अमाऊंट (चित्रपटाच्या सुरुवातीला देण्यात येणारी रक्कम) ही भविष्यातील कामाच्या बदल्यात दिलेला सन्मान आहे, हे दान नाही. जेव्हा आपल्यातील एखादा कठीण काळातून जात असेल, तेव्हा इंडस्ट्रीने त्याला आठवण करून दिली पाहिजे की तो एकटा नाही. असं करून आपण दाखवून देतो की आपण या इंडस्ट्रीपेक्षा मोठे आहोत’, अशी पोस्ट सोनू सूदने लिहिली आहे.
Rajpal Yadav is a gifted actor who has given years of unforgettable work to our industry. Sometimes life turns unfair, not because of talent, but because timing can be brutal. He will be part of my film, and I believe this is the moment for all of us..producers, directors,…
— sonu sood (@SonuSood) February 10, 2026
सोनू सूदच्या आगामी चित्रपटात राजपाल काम करणार असून त्या चित्रपटाची साइनिंग अमाऊंट त्याने मदत म्हणून दिली आहे. त्याचप्रमाणे हे दान नसून हा सन्मान असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राजपाल यादवचं हे प्रकरण 2010 पासून सुरू आहे. त्याने त्याच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. ज्यामुळे राजपालचं मोठं नुकसान झालं होतं. चित्रपटासाठी घेतलेलं कर्ज फेडणं त्याला शक्य झालं नाही. राजपालने जे चेक दिले होते, ते बाऊन्स झाले होते. अखेर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
2018 मध्ये दिल्लीतल्या एका दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्यावेळी त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. राजपालने दिल्ली उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं. जून 2024 मध्ये उच्च न्यायालयाने राजपालच्या प्रकरणात सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक उपाययोजना अवलंबवण्याचं आवाहन केलं होतं. त्याचप्रमाणे त्याची शिक्षा तात्पुरती स्थगित केली होती. परंतु राजपालकडून रक्कम अद्याप भरली न गेल्याने अखेर 2 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालायने त्याला आत्मसमर्पणाचे निर्देश दिले. तोवर त्याने तक्रारदाराला रक्कम परत करण्याच्या वचनांचं वारंवार उल्लंघन केलं होतं.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




