
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी निघालेल्या ‘पुनर्वसु’ नक्षत्राने रौद्र रूप दाखवत नांदेड जिल्ह्याला पावसाने शुक्रवारी रात्रीपासूनच झोडपायला सुरूवात केली असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. शेजारील हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा फटकाही नांदेडला बसला असून आसना नदीने रौद्र रूप धारण केल्याने नांदेड-मालेगाव-वसमत महामार्गावरील वाहतूक बंद पडली. जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली.
मृगनक्षत्रानंतर दडी मारलेल्या पावसाचे पुनर्वसु नक्षत्रात आगमन झाले. शुक्रवारी रात्रीपासून शहर तसेच जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. जोरदार पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे रस्ते बंद झाल्याचे पहावयास मिळाले. नांदेड शहरासह अनेक जागी ढगफूटीसदृश पाऊस झाला. या कोसळलेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील जमीन खचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वीज कोसळून मुलीचा मृत्यू –
या पावसादरम्यान भोकर तालुक्यातील भुरभुशी गावात वीज कोसळून 15 वर्षीय मुलगी आडेला नारायण डमेवाड हिचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे काम करत असताना अचानक पूर आल्याने विहिरीचा काही भाग कोसळून या घटनेत दोन मजूर अडकले होते. त्या मजुरांना एसडीआरएफच्या पथकाने शनिवारी सकाळीच बाहेर पुरातून सुखरूप सुटका केली.
जिल्ह्यात मुदखेड व अर्धापूर तालुक्यात 110 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्या खालोखाल नांदेड-95.70 मि.मी., उमरी-76.10 मि.मी., भोकर-78.10 मि.मी., बिलोली-60.20 मि.मी., लोहा-69.90 मि.मी., कंधार-52.90 मि.मी., हदगाव-49.30 मि.मी., हिमायतनगर 60.80 मि.मी., धर्माबाद-65.70 मि.मी., नायगाव-61.10 मि.मी., देगलूर-29.90 मि.मी., किनवट-30.80 मि.मी., मुखेड-30.60 मि.मी. असा 58.80 मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
अनेक गावांचा संपर्क तुटला –
आसना नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड महामार्गावरील पूल बंद करण्यात आला होता. शहरातील कौठा, सिडको, तसेच मुदखेड, मुखेड, अर्धापूर या तालुक्यातील सखल भागात पावसाचे पाणी शिरले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (खु.), शेलगाव (बु.), शेणी, कोंढा, गणपूर, देळूब (खु.), देळूब (बु.) यासह अनेक गावांचा संपर्क तुटला. या बाबीची माहिती नांदेडच्या जिल्हाधिकार्यांना समजताच त्यांनी एसडीआरएफच्या पथकासह अर्धापूर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. मुदखेड तालुक्यातील वैजापूर पार्डी या गावाला सिता नदीला पूर आल्याने वेढा पडला तर राजवाडी येथील एका शेतकर्याची बैलजोडी वाहून गेल्याचेही सांगण्यात आले. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.
विष्णुपुरीचे दोन दरवाजे उघडले –
नांदेड शहर व जिल्ह्यातील काही भागासाठी वरदान ठरलेल्या विष्णुपुरी शंकरसागर जलाशयाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रशासनाने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन दरवाजे उघडले आहेत. या दोन दरवाजांमधून 812 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

