
Pune : पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून मित्रानेच साथीदारांच्या मदतीने आपल्या मित्राचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना वारजे परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद केले आहे. राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (रा. आंबेगाव, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिस अंमलदार बाळू गायकवाड व साई कारके यांना खबऱ्यामार्फत गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान दोन संशयित इसम थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित पळून जात असताना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. शुभम राजेश शिंदे (वय २५, रा. नांदेड सिटी), लकी सुरेंद्र सिंग (वय २३, रा. खडकी) आणि सुनील संतोष खलसे ऊर्फ एस. के. (वय १९, रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
|
|
राजेंद्र ऐलगच्चे याला २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री आकाशनगर येथील शनी मंदिर टेकडी येथे पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून बोलावून घेतले. त्यानंतर लोखंडी हत्याराने वार करून डोक्यात दगड घालून खून केला. ओळख लपविण्यासाठी चेहऱ्यावरही दगडाने घाव घातल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार मयत राजेंद्र याने एकाला १८ लाख रूपये दिले होते, है पैसे वसुल करून देतो आरोपी शुबमने सांगितलं. यामधील जवळपास ११ लाख रूपये त्याने वसलूही केले होते, है पैसे राजेंद्र मागू लागला होता. मात्र शुभमने त्याच्या साथीदारांसह बोलावून घेत त्याला संपवण्याचा कट आखला, जेणेकरून राजेंद्रला मारल्यावर पैसे द्यावे लागणार नाहीत.
दरम्यान, आकाशनगर येथील वन विभागाच्या जागेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. वारजे पोलिस ठाण्यात शिपाई भूषण निकम यांनी तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासात धारदार हत्याराने हल्ला करून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात मृत तरुणाची ओळख निष्पन्न झाली. पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे आणि त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींना पुढील तपासासाठी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, खुनामागील आर्थिक व्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel




1 thought on “Pune : शुभ्यानेच केला घात! १८ लाखांचा व्यवहार, ११ लाखांची वसुली पण… पुण्यातील खुनाचा गुन्हा पोलिसांनी १२ तासांत उघड केला”