पुणे - संगमवाडी येथील सिटी सर्व्हे नंबर ९२ आणि ९३ (नाईक बेट) (Nike Bet) या ३४ एकर (१४ लाख ८१ हजार चौरस फूट) जागेचा टीडीआर (TDR) देण्याबाबतचा विचार महापालिकेच्या (Municipal) स्तरावर सुरू आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या टीडीआरची किंमत सुमारे तीन हजार ३३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आरक्षणाच्या जागेचा आणि किमतीचा टीडीआर दिला जाणार आहे.
महापालिकेने २०१३ मध्ये जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. त्यात या जागेवर उद्यानाचे आरक्षण दर्शविले होते. परंतु आराखडा मुदतीत न केल्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने २०१५ मध्ये हा आराखडा महापालिकेच्या हातातून काढून स्वत:च्या ताब्यात घेतला. त्यावर एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने राहिलेल्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र हा आराखडा अंतिम करताना चोक्कलिंगम समितीने या जागेवरील उद्यानाचे आरक्षण काढून टाकले. परंतु तत्कालीन राज्य सरकारने ५ जानेवारी २०१७ मध्ये त्यास मान्यता देताना या जागेवर टाकलेले उद्यानाचे आरक्षण कायम केले.
या जागेवर उद्यानाचे आरक्षण टाकल्यामुळे एका खासगी विकसकाने ही जागा टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेला देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. ही जागा ३४ एकर इतकी आहे. नाईक बेट म्हणून ते ओळखले जाते. मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. पावसाळ्यात अनेकदा हे बेट पाण्याखाली जाते. वनराईने नटलेल्या या बेटावर कोणतीही वस्ती नाही. कैलास स्मशानभूमीपासून या बेटावर जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. त्यामुळे महापालिका यावर काय निर्णय घेणार?, याकडे लक्ष लागले आहे.
एक एकर म्हणजे ४३ हजार ५६० चौरस फूट. पार्क आरक्षणाची जागा ३४ एकर म्हणजे १४ लाख ८१ हजार चौरस फूट आहे. २०२०-२१ च्या रेडी रेकनरमध्ये या जागेचा दर दोन हजार २५१ रुपये चौरस फूट आहे. २८ जानेवारी २०१६ मध्ये राज्य सरकारने टीडीआर धोरण निश्चित केले. त्यानुसार रेडी-रेकनरमधील त्या जागेच्या किमतीनुसार दुप्पट टीडीआर देण्यात देतो. नाईक बेट हे ‘बांधकाम योग्य क्षेत्र’ (नॉन बिल्टअप) असल्यामुळे या जागेचा एकपटच टीडीआर देता येणार आहे. २०२०-२१ मधील तेथील जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर विचारात घेतला, तर या टीडीआरचे मूल्य तीन हजार ३३ कोटी रुपये एवढे होणार आहे. एक एप्रिलपासून रेडी-रेकनरच्या दरात किमान सहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. नवे दर विचारात घेतले, तर या टीडीआरची किंमत आणखी वाढणार आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणारा कालवा भूमिगत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या मोबदल्यात तेवढ्या जागेचा टीडीआर देण्याचा प्रस्ताव यापूर्वी महापालिकेत मंजुरीसाठी आला होता. त्यावरून शहरात वादळ निर्माण झाले होते. नंतर हा प्रस्ताव बारगळला. जलसंपदा विभागाने हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता ३४ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या नाईक बेटाचा टीडीआर देण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
टीडीआर देऊन ही जागा ताब्यात घेण्याची गरज नाही. पावसाळ्यात अनेकदा ती जागा पाण्याखाली जाते. त्याऐवजी आराखड्यातील अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधा असलेल्या आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे नाईक बेटाचा टीडीआर देण्याचा विचार महापालिकेने तातडीने थांबवावा. या बेटावर उद्यान करणे महत्त्वाचे नाही, तेथे आधीच वनराई आहे. असे असताना ते ताब्यात घेऊन त्याच्या मोबदल्यात टीडीआर देऊन शहरात क्रॉंक्रिटचे जंगल उभारणे योग्य होणार नाही.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

