पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:झोपेचे नियम मोडल्यास आजार‎ शरीरात प्रवेश करण्यास सज्ज‎

आजकाल बहुतेक लोक झोपेकडे दुर्लक्ष करत आहेत. काही जण खूप‎ कमी झोपतात, तर काहींची झोपण्याची वेळ अनियमित असते. काही‎ दिवसांपूर्वी माझी एका वरिष्ठ राजकारण्याशी भेट झाली. ते म्हणाले, ‘‎अनेक वर्षे मी चार-पाच तासच झोपतो.’ ‘अलीकडे मला स्मरणशक्ती ‎काहीशी कमी झाल्याचे जाणवते. सतत एक प्रकारचा थकवा‎ जाणवतो. पण मला अजूनही राजकारणात खूप पुढे जायचे आहे.’ ‎यातून सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे झोपेशी केलेली तडजोड ‎धोकादायक ठरू शकते. सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल व ‎अनियमित वेळी झोप घेत असाल, तर निद्रानाश, स्लीप ॲपनिया‎यांसारखे विकार उद्भवू शकतात व पुढे अल्झायमरचाही धोका वाढू‎ शकतो. म्हणून, कितीही व्यग्र असलात तरी किमान सात तास झोप‎घ्यावी. तसेच एक नियम ठरवा— सूर्योदयानंतर एक तासापेक्षा जास्त‎वेळ अंथरुणात पडून राहू नका. सूर्यास्तानंतर सहा तासांत झोपण्याचा ‎प्रयत्न करा. निसर्गाने मानवी शरीर विशिष्ट नियमांनुसार घडवले.‎झोपेचे नियम मोडले, तर गंभीर आजार शरीरात प्रवेश करण्यासाठी ‎जणू संधीचीच वाट पाहतात.‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *