नवनीत गुर्जर यांचा कॉलम:खोटारड्यांनी खोटारड्यांना सांगितलेय, खरे बोला!

‎‎‎‎‎‎‎‎‎‎फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड,‎पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांत निवडणुका‎आहेत.‎ पुन्हा एकदा तीच निवडणुकीतील आश्वासने, त्याच‎घोषणा व आकर्षित करणाऱ्या डावपेचांची वेळ येणार‎आहे! खरे तर, निवडणुकीतील वचने वेळेच्या‎पायवाटेसारखी असतात. प्रचाराचा काळ संपल्यावर‎त्यावर इतके गवत उगवते की, त्या वचनांच्या‎पाऊलखुणाही शोधून सापडत नाहीत! सेवेसाठी नाही, तर‎केवळ निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार आपल्याला‎भुलवणारी आश्वासने देतात आणि आपण ती सहज‎मानूनही घेतो.‎ नेत्यांना पाहताच आपल्या ओठांवर अनेक ‘किंतु’, ‘परंतु''‎येतात. पण आपण त्याचे प्रश्नांत रूपांतर करत नाही.‎आपण ते ओठांवरच पुसून टाकतो. जीभ तर फक्त‎सत्तेलाच असते. माणूस तर कधीपासून शांत आहे. ही‎गोष्ट तरुणांची आहे.‎ त्यांना आजकाल ‘जेन-झी'' म्हटले जाते. हे तरुण आज‎खूप लोकप्रियही आहेत.‎ कधी जंतर-मंतरमुळे, कधी रामलीला मैदानामुळे तर‎कधी स्वतःच्या अटकेमुळे. सरकारांना या जेन-झीच्या‎आंदोलनाचा किंवा त्यांच्या रागाचा काहीच तोडगा‎सापडत नाहीये. तसेही वृद्धांनी भरलेल्या सरकारांना‎तरुणांचे प्रश्न समजणे जरा कठीणच जाते.‎ तरुण मात्र ऐकायला तयार नाहीत. हे अगदी बरोबर आहे. ‎‎वयच असे असते की, आतापर्यंत पाहिलेले आणि ‎‎अनुभवलेले सर्वकाही अजब वाटू लागते.‎ आसपासचे आणि दूरवरचे सर्वकाही अनोळखी वाटू‎लागते. समाज, सरकार आणि कुटुंबाची सर्व बंधने‎पेटत्या चुलीत फेकून द्यावीशी वाटतात. आकाशातील तारे ‎‎दुरूनच पाहायचे असतात.‎ त्यांना आपण ‘सप्तर्षी'' म्हणतो. त्यांच्याजवळ जाऊन‎त्यांना स्पर्श करावासा वाटतो. खरे तर, कोणत्याही तरुण ‎‎मनाला संयम आणि समाधानाचे जिणे नको असते. ‎‎तारुण्याचे सत्यच हे आहे की, त्याला समाधीची शांतता‎नाही तर भटकंतीची अस्वस्थता मिळालेली असते! ‎‎कपड्यांसारखे आसपासचे सर्वकाही तोकडे वाटू लागते. ‎‎अशा वेळी आपण कोणत्याही व्यवस्थेचा किंवा‎सरकारचा बुरसटलेला विचार का सहन करावा? आणि‎तो कधीपर्यंत सहन करायचा?‎ जगात कुठल्याही कोपऱ्यात अन्याय होताना पाहून‎श्वासात आग पेटत नाही, तो तरुण कसला? आणि ते‎तारुण्य तरी कसले? तसे पाहता, सध्या काँग्रेस आणि‎त्यांचे मित्रपक्ष जेन-झीच्या सर्व मुद्द्यांचा राजकीय फायदा ‎‎घेण्याचा प्रयत्न करत आहेत.‎ स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेसने समाजवाद्यांचे सर्व नारे‎चोरले होते. ‘आम्ही विखुरलेला समाज एकत्र बांधत ‎‎आहोत'', असे तेव्हा सांगितले गेले.‎ नंतर मात्र मतांसाठी त्याच जातींना पुन्हा विस्कळीत केले‎गेले.‎ आज पुन्हा तसेच घडताना दिसत आहे. राहुल गांधींना‎वाटत आहे की, ते जेन-झीचे नेते म्हणून पुढे येत आहेत.‎ काँग्रेसला वाटतेय की, जेन झीच्या आधारे आपली नाव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पार करण्याची हीच योग्य संधी आहे.‎ कदाचित असे होईलही. पण दिल्ली अजून खूप दूर आहे,‎म्हणजेच लोकसभा निवडणुकीला अजून खूप वेळ आहे!‎ पाच राज्यांत आता निवडणुका होणार आहेत. तिथे‎जेन-झीचा प्रभाव चालला, तर सत्ता उलटायला वेळ‎लागणार नाही.‎ पण आंदोलन करणारे आणि घरात बसून त्यांना पाठिंबा‎देणारे तरुण प्रत्यक्षात किती मतदान करतात? त्यातील‎किती जण पोलिंग बूथपर्यंत पोहोचतात? हा वेगळा प्रश्न‎आहे.‎ असे असले तरी, आग दोन्ही बाजूंनी सारखीच लागलेली‎आहे!‎ काँग्रेस मतांच्या चोरीचा आरोप करून लोकांना आपल्या‎बाजूने करू इच्छिते. तर दुसरीकडे, पहिल्यांदाच सत्ताधारी‎पक्ष किंवा बहुतांश राज्य सरकारे आणि केंद्र सरकारही‎देशात विरोधी पक्षाविरोधात रस्त्यावर उतरायला तयार‎आहेत. ते आंदोलन करतही आहेत!‎ सामान्य माणसासाठी सत्ताधारी आणि विरोधक‎यांच्यातील हे विरोध-निदर्शने म्हणजे एक तमाशाच आहे.‎ अशा वेळी प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांची आठवण‎येते... :‎ ‎ ‘झूठों ने झूठों से कहा है,‎ सच बोलो…‎ सरकारी ऐलान हुआ है,‎ सच बोलो…!‎ घर के अंदर झूठों की एक मंडी है,‎ दरवाजे पर लिखा हुआ है,‎ सच बोलो…!’‎ आश्वासने, घोषणांची वेळ...‎पुन्हा निवडणुकीतील तीच आश्वासने,‎त्याच घोषणा व आकर्षित करणाऱ्या‎डावपेचांची वेळ येईल. निवडणुकीतील‎आश्वासने ही जणू वेळेच्या‎पायवाटेसारखी असतात. प्रचार झाल्यावर‎त्यावर इतके गवत उगवते. त्यात‎आश्वासनांच्या पाऊलखुणाही दिसत‎नाहीत! सेवेसाठी नव्हे तर फक्त निवडणूक‎जिंकण्यासाठी उमेदवार आश्वासने देतात‎व आपणही ती खरी मानतो.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *