‘त्या’ संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाहीच; अनिल परब यांची ठाम भूमिका

अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपासून कामावर रुजू होण्याची विनंती करत आहे. कोर्टाने आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांवर कारावाई न करण्याचे आदेश दिले. आम्ही कोणतीही कारवाई न करण्याची हमी दिली असल्याचे परब म्हणाले.

२२ तारखेपासून कर्मचारी कामावर आले नाहीतर आम्ही समजू या कर्मचाऱ्यांना कामाची गरज नाही. काही लोक कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत. कर्मचाऱ्यांना ठरवायचे कोणाच्या नादाला लागायचे, कर्मचारी चुकीच्या लोकांच्या नादाला लागले असल्याचे परब म्हणाले.

भरतीची प्रक्रीया २२ एप्रिलच्या पुढे करणार आहे.एसटी कामगारांनी चुकीचा नेतृत्व निवडले त्यामुळे कामगारांचे नूकसान झाले आहे. सदावर्ते यांच्यामुळे कामगारांना काहीच हाताला लागलेले नाही, असही परब म्हणाले. कामगारांवर केलेली कारवाई मागे घेतली जाईल हे आम्ही यापूर्वीही सातवेळा सांगितलेले. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.

एसटी महामंडाळाटचे २ हजार कोटींचे नूकसान

एसटी  महामंडळाचा पाच महिन्यात २ हजार कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता महामंडळाला हा तोटा भरुन काढावा लागणार आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत. पुढील चार वर्षासाठी रोडमॅप बनवणार असल्याचे परब म्हणाले.

आजपर्यंत पीएफ (PF) आणि ग्रॅज्युटीपासून वंचित ठेवलेले नाही. कर्मचाऱ्यांनी विलगीकरणासाठी पगारावर पाणी सोडले आहे. कोर्टाने सांगितले आहे नो वर्क नो पेमेंट त्यामुळे संप काळातील पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याची विनंती अनिल परब  यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply