पुणे: पुण्यात मार्केटयार्ड परिसरात रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडले; फरार आरोपीला अटक

पुणे: पुण्यात मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्यामुळे त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या अंगावर भरधाव वेगाने कार घातली. 20 एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर फरार कारचालक व्यावसायिक अनुप मेहता याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाने हलगर्जीपणाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर घातली. यामध्ये रस्त्यावर झोपलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी किया सेल्टास कार एमएच 12 एस क्यू 9425 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *